रत्नागिरी : दिवाळीच्या सणानंतर रत्नागिरीकरांना नाटकाचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित 63 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटया स्पर्धा 2023-24 प्राथमिक फेरी रत्नागिरीतील स्वा. विनायक दामोदर सावरकर नाटयगृह येथे सुरू होत आहे. 26 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2024 च्या दरम्यान रोज सायंकाळी 7 वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत.
सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाटय स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केले आहे. रत्नागिरी केंद्रावर रत्नागिरी शहरासह जिल्हाभरातील एकूण 9 संघांचा सहभाग असणार आहे. राज्य नाटय स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत-जास्त प्रेक्षकांनी उपस्थित रहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा, असे आवाहन संचालक चवरे यांनी केले आहे. रत्नागिरी स्पर्धा समन्वयक म्हणून नंदू जुवेकर हे काम पाहणार आहेत.
स्पर्धत सहभागी होणार नाटके पुढीलप्रमाणे
▪️26 नोव्हेंबर
शिवाई सहकारी पतसंस्था मर्या. येळवण निर्मित
नाटक – आजीचा बॉयफ्रेंड
▪️27 नोव्हेंबर
श्रीरंग, रत्नागिरी निर्मित
नाटक – मॉर्फोसिस.
▪️28 नोव्हेंबर
श्री लक्ष्मीपल्लीनाथ व इतर देवस्थान पाली निर्मित
नाटक – अखेरचा सवाल.
▪️29 नोव्हेंबर-संकल्प कलामंच निर्मित
नाटक – रुक्ष.
▪️30 नोव्हेंबर –
संगमेश्वर तालुका सांस्कृतिक कलामंच, देवरुख निर्मित
नाटक – जब वी मेट.
▪️1 डिसेंबर – प्रयोगिक थिएटर्स असोसिएशन रत्नागिरी निर्मित
नाटक – महानायक.
▪️2 डिसेंबर – सहयोग रत्नागिरी निर्मित
नाटक – चांदणी.
▪️3 डिसेंबर – कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघ कोतवडे, रत्नागिरी निर्मित
नाटक – कडीपत्ता.
▪️4 डिसेंबर -खल्वायन, रत्नागिरी निर्मित
नाटक – स्वप्नपक्षी.