खेड : लातूर येथील 78 वर्षीय वृद्धाचा रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मारुती बाळाराम सुर्वे असे मृत वृद्धाचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यांना मृत घोषित केले. त्यानुसार खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.