क्रिकेट : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला चौथ्या आणि अंतिम टी 20i सामन्यात विजयासाठी 284 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं आहे. संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या दोघांनी नाबाद शतक ठोकलं. दोघांनी केलेल्या या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 विकेट्स गमावून 283 धावा केल्या. भारताची ही परदेशातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. तसेच टीम इंडियासाठी संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या दोघांनी कोणत्याही विकेटसाठी विक्रमी आणि नाबाद भागीदारी केली. दोघांनी 85 बॉलमध्ये नॉट आऊट 210 रन्सची पार्टनरशीप केली. तर गोलंदाजीमध्ये अर्शदीप सिंगच्या बॉलिंगचा कहर पहायला मिळाला. अर्शदीपने तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतला अन् सामना टीम इंडियाच्या बाजूने झुकवला. त्यानतंर वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल खेळ खल्लास केला. टीम इंडियाने 135 धावानी मोठा विजय मिळवला.
स्फोटक सुरुवात आणि तसाच शेवट
कॅप्टन सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाला अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या दोघांनी स्फोटक सुरुवात करुन दिली. दोघांनी पावरप्लेचा पूर्ण फायदा घेत तोडफोड बॅटिंग केली. मात्र सहाव्या ओव्हरमधील सहाव्या बॉलवर अभिषेक शर्मा आऊट झाला आणि ही जोडी फुटली. भारताला 73 धावांवर पहिला झटका लागला. अभिषेक शर्मा 18 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 2 फोरसह 200 च्या स्ट्राईक रेटने 36 धावा करुन माघारी परतला.
संजू आणि तिलकचा झंझावात आणि विक्रमी भागीदारी
अभिषेकनंतर दक्षिण आफ्रिकेला एकही विकेट मिळाली नाही. संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या वादळी खेळी करत गोलंदाजांची वरात काढली. दोघांनी मैदानात चौफेर फटकेबाजी केली. दोघेही बॉल येईल तसा फटका मारत होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज हैराण झाले. दक्षिण आफ्रिकेला विकेटची संधी होती.मात्र त्यांच्या खेळाडूंनी सोप्या कॅच टाकल्या. या संधींचं दोघांनी फायदा घेतला आणि दुप्पट वेगाने फटकेबाजी केली.
सलग 2 शतकानंतर सलग 2 वेळा शून्यावर बाद होणाऱ्या संजू सॅमसन याने 51 चेंडूत शतक पूर्ण केलं. संजू यासह एका वर्षात 3 टी 20i शतकं करणारा पहिला फलंदाज ठरला. संजूनंतर तिलकने 41 बॉलमध्ये सेंच्युरी पूर्ण केली. तिलकचं हे सलग दुसरं शतक ठरलं आणि त्याने संजूच्या विक्रमाची बरोबरी केली.
विक्रमी भागीदारी
दोघांनी दे दणादण बॅटिंग करत भारताला 20 ओव्हरमध्ये 283 धावांपर्यंत पोहचवलं. यासह दोघांनी टीम इंडियासाठी कोणत्याही विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली. दोघांनी दुसर्या विकेटसाठी 85 बॉलमध्ये नॉट आऊट 210 रन्सची पार्टनरशीप केली. तिलक वर्माने 47 चेंड़ूत 10 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 120 धावा केल्या. तर संजूने 56 बॉलमध्ये 9 सिक्स आणि 6 चौकारांच्या मदतीने नॉट आऊट 109 रन्स केल्या.