मेष – आज कुटुंबात व कामाच्या ठिकाणी समजूतदारपणाने व्यवहार केल्याने संघर्ष टळतील. वाणीवर नियंत्रण न राहिल्याने कोणाशी वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. स्त्रियांकडून फायदा होईल.मनाची उदासीनता आपल्या मनात नकारात्मक विचार निर्माण करील.
वृषभ – आज खंबीर विचारांमुळे आपण सावधपणे काम कराल. आर्थिक विषयांचे योग्य नियोजन कराल. आपली कलात्मक जाण वाढीस लागेल. वस्त्रे, अलंकार, सौंदर्य प्रसाधने व मनोरंजनावर खर्च होईल.
मिथुन- आज आपली वाणी किंवा व्यवहार इतरांशी गैरसमज निर्माण करू शकतात. कुटुंबीय व सगे – सोयरे यांच्याशी वागताना खूप सांभाळून राहावे लागेल. आजार किंवा दुर्घटना होण्यामुळे ते संबंध सांभाळा. मान – प्रतिष्ठेची हानी होईल.
कर्क- आजचा दिवस आर्थिक नियोजन व नव कार्यारंभ करण्यासाठी उत्तम आहे. उद्योग – व्यवसायात लाभ, नोकरीत बढती, उत्पन्नाच्या मार्गांत वाढ झाल्याने आपणाला खूप आनंद व समाधान वाटेल. मित्र, पत्नी, संतती अशा सर्वांकडून आनंददायी बातम्या मिळतील. मंगलकार्ये ठरतील.
सिंह – आजचा दिवस नोकरी – व्यवसायात लाभदायी व यशदायी आहे. आपल्या कार्य क्षेत्रात वर्चस्व मिळवाल व प्रभाव पाडाल. पुरेपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल यामुळे आपली कामे सहजपणे पार पडतील. वरिष्ठ अधिकारी आपल्या कामाची कदर करतील. पदोन्नतीची शक्यता आहे.
कन्या – आजचा दिवस आपला परोपकारी कार्यात खर्च होईल. एखाद्या प्रवासात संवाद साधण्याची संधी मिळेल. परदेशगमनाचे योग येतील. भावंडांकडून लाभ होईल. कार्यालयात वरिष्ठांपासून सांभाळून राहा. आर्थिक लाभ होईल.
तूळ- आजचा दिवस अचानक धनलाभाचा आहे. एखाद्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तरीही नवे कार्य हाती घेऊ नका. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. हितशत्रू आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. जलाशय व स्त्री वर्गापासून सावध राहावे.
वृश्चिक – आज दैनंदिन घटनाक्रमात बदल होईल. आज आपण मौज- मजा व मनोरंजनाच्या विश्वात फिरण्याच्या मूडमध्ये असाल. मित्र व कुटुंबीयांची त्यात साथ मिळेल. सार्वजनिक जीवनात मान – प्रतिष्ठा वाढेल. नवीन वस्त्र प्रावरणे व वाहन सुख मिळेल. भागीदारीत लाभ होईल.
धनु- आजचा दिवस आर्थिक व व्यापारी नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. कार्ये यशस्वी होतील. आज परोपकाराची भावना प्रबळ होईल. आजचा दिवस आनंदात व्यतित होईल. नोकरी – व्यवसायात उन्नती व मान – सन्मान प्राप्त होईल. कौटुंबिक जीवनात आनंदी आनंद असेल.
मकर- आज बौद्धिक कामे व व्यवसायात आपण नवी विचार प्रणाली अंमलात आणाल. लेखन व साहित्य क्षेत्रात आपली सृजनात्मकता दिसेल. तरीही मनाच्या एका कोपर्यात अस्वस्थता जाणवेल. परिणाम असा होईल की त्यामुळे शारीरिक थकवा व ऊबग येईल.
कुंभ- आज नकारात्मक विचारांनी मन हताश होईल. आज उद्वेग व क्रोध आपल्या मनात जागा घेईल. खर्च वाढेल. बोलण्यावर संयम न राहिल्याने घरात मतभेद व भांडणे होतील. स्वास्थ्य खराब होईल.
मीन- आजचा दिवस सुख शांतीत जाईल. व्यापार्यांना भागीदारीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. पति – पत्नी वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. मित्र, स्वजन ह्यांचा सहवास घडेल. प्रणयाराधन वाढेल.