दापोली : दापोली विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार योगेश कदम यांच्या प्रचारार्थ 16 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दापोलीत येत आहेत. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकालगतच्या आझाद मैदानात सकाळी 11 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्यांदा दापोलीत येणार आहेत. यावेळी ते विरोधकांवर कसे तुटून पडतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या झालेल्या सभेतील आरोपांना ते कसे उत्तर देतात याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी त्यांच्या समवेत खासदार सुनील तटकरे हेदेखील उपस्थित राहणार असल्याचे शिवसेना प्रचार कार्यालयातून सांगण्यात आले. तसेच या सभेला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार का याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.