छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात छत्रपती संभाजीनगर-जळगाव रोडवर स्थिर पथकाने मोठी कारवाई केली आहे. काल गुरुवारी सायंकाळी सिल्लोड फाट्यावर असलेल्या चेकपोस्टवर तब्बल १९ कोटी रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने जप्त केले आहेत.
संभाजीनगर-जळगाव रोडवरील निल्लोड फाट्यावर असलेल्या चेकपोस्टवर संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या वाहनाची तपासणी केली असता त्यांना यात १९ कोटी रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने सापडले. हे दागिने जळगाव येथील एका नामांकित ज्वेलर्सचे असल्याची माहिती मिळाली आहे. सदर सापडलेलं हे सोनं-चांदी जीएसटी विभागाच्या ताब्यात देण्यात आलं आहे. दागिने खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी संबंधितांना बोलावण्यात आलं आहे. तसेच याबाबतच्या सर्व कागदपत्रांचीही पडताळणी केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
नेमकं काय घडलं?
संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या एका सराफा दुकानदाराचे जवळपास १९ कोटी रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने पकडले. स्थिर पथकाकडून ही कारवाई काल गुरुवारी सायंकाळी करण्यात आली. हे दागिने जळगाव येथील एका नामांकित ज्वेलर्सचे असल्याची माहिती समोर आली आहे. स्थिर पथकाने जप्त केलेलं सोनं-चांदी जीएसटी विभागाकडे दिलं आहे. दागिने खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी संबंधितांना बोलवण्यात आलं आहे. तसेच याबाबतच्या सर्व कागदपत्रांचीही पडताळणी केली जाणार आहे.