खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील दाभिळनजीक रविवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास 74 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला होता. तसेच पाच लाख रुपये किमतीच्या सुझुकी कारसह फरहान फारूख मोहम्मद पटेल (37, रा. गोवळकोट रोड, पेठमाप – चिपळूण) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आरोपीच्यावतीने ऍड. सुधीर शरद बुटाला व समीर शरद शेठ यांनी जिल्हा न्यायालय खेड येथे जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. याकामी ऍड. शेठ यांनी युक्तिवाद करून आरोपीला जामीन देणे कसे गरजेचे आहे? याबाबत केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीशांनी आरोपीची जामीनावर मुक्तता केली.
काय आहे घटना
फरहान पटेल हा मारूती सुझुकी झेन इस्टिलो कारमधून (एम.एच.-02/बी.जे.-3329) गुटख्याची वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच दाभिळनजीक पोलिसांनी सापळा रचला. या मार्गावरून मारूती सुझुकी कार जात असताना पथकाने कार अडवून तपासणी केली. या तपासणीत गुटख्याच्या 17 पोत्यांमध्ये प्रत्येकी 22 पाकिटे असा एकूण 74 हजार 52 रूपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. याशिवाय पाच लाख रुपये किंमतीची सुझुकी कारही जप्त केली होती. पोलिसांनी फरहान याला अटक करून न्यायालयासमोर सादर केले असता न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर फरहान याच्या बाजूने ऍड. शेठ यांनी युक्तिवाद करून आरोपीला जामीन देणे कसे गरजेचे आहे? याबाबत केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीशांनी आरोपीची जामीनावर मुक्तता केली.