मुंबई:-मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमती 4 नोव्हेंबरपासून 6% ने घसरल्या आहेत. त्यात प्रति 10 ग्रॅम 4,750 रुपयांनी घट झाली आहे.
सोन्याचे भाव घसरल्याने लग्नाच्या तयारीत असलेले लोक या संधीचा फायदा घेऊ शकतात. सेन्को गोल्ड अँड डायमंड्सचे एमडी आणि सीईओ सुवांकर सेन म्हणाले, “किमती घसरल्यामुळे दुकानांमध्ये चौकशी वाढली आहे. आगामी लग्नाच्या मोसमात आम्हाला अधिक विक्रीची अपेक्षा आहे.” इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) चे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी यूएस निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच ET ला सांगितले होते की ज्यांच्या कुटुंबात आगामी विवाहसोहळे आहेत त्यांच्यासाठी सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यांना आता थोडा दिलासा मिळू शकतो.