देवरुख:- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात नेहरूजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी नेहरूजींच्या विचारांचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. बालकांवरील त्यांच्या अपार प्रेमामुळे नेहरूजींना “चाचा नेहरू” म्हणून ओळखले जात असे. त्यांच्या या प्रेमळ स्वभावाचा आदर्श ठेवत उपप्राचार्य डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांना बालदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांनी नेहरूजींना आदरांजली अर्पण करून नेहरूजींच्या विचार, त्यांचे जीवन आणि कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाची प्रस्तावना सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. संदीप मुळ्ये यांनी केली. याप्रसंगी कार्यक्रमाला सांस्कृतिक विभागातील प्रा. सुनील वैद्य, प्रा. स्वप्नाली झेपल आणि प्रा. संचिता चाळके उपस्थित होत्या.