रत्नागिरी:-सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे काम चांगल्या रितीने सुरू आहे.मुख्यमंत्री संशोधन निधीअंतर्गत या संशोधन केंद्राला निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करू. कोकण विकासाच्यादृष्टीने संशोधक आणि विस्तार शिक्षण कार्यकर्ते म्हणून आपण शेतकऱ्यांना कशा प्रकारे उपयोगी पडतो, त्यांचे उत्पादन वाढवण्याकरिता नवीन शेतीपूरक व्यवसायाच्या संधी निर्माण करून देणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी केले.
विद्यापिठाच्या झाडगाव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे, संशोधन केंद्रप्रमुख डॉ. सुरेश नाईक, मत्स्य अभियांत्रिकी पदविका विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष मोहिते, डॉ. आसिफ पागरकर, माजी संशोधन अधिकारी डॉ. शेखर कोवळे व डॉ. विजय निंबाळकर उपस्थित होते.
डॉ. सुरेश नाईक यांनी प्रस्तावनेत संशोधन केंद्राचा इतिहास, सद्यस्थिती आणि संशोधन केंद्राचा संशोधन आढावा सादर केला. वरिष्ठ संशोधन सहाय्यक अपूर्वा सावंत यांनी सूत्रसंचालन केले. सचिन साटम यांनी आभार मानले. दुपारच्या सत्रात कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. यामध्ये डॉ. शेखर कोवळे, एकनाथ पंडये, डॉ. हरीश धमगाये, वर्षा सदावर्ते, मंगेश नांदगावकर, महेश किल्लेकर, मनिष शिंदे, दिनेश कुबल, स्वप्नील आलीम, जीविका किल्लेकर यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाला डॉ. विजय दळवी, डॉ. किरण माळशे, राजाराम धनावडे, विलास यादव, वैभव येवले, डॉ. नितीन सावंत, डॉ. अनिल पावसे, डॉ. स्वप्नजा मोहिते, डॉ. बाळासाहेब चव्हाण व डॉ. केतन चौधरी उपस्थित होते. सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रामधील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी केला.