3 हजार 583 वयोवृद्ध आणि 592 दिव्यांग करणार घरातून मतदान
रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये गुरुवार 14 ते 17 नोव्हेंबर या काळात गृह मतदान होणार आहे. त्या बाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत पाचही विधानसभा मतदारसंघात तशी सुविधा भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार केली आहे. जिल्ह्यातील 85 वर्षापुढील 3 हजार 583 मतदार आणि 592 दिव्यांग मतदारांचे आजपासून घरातून मतदान होणार आहे.
विधानसभा निवडणूक 2024 साठी टपाली मतदानाने मतदानास सुरुवात झाली आहे. त्याप्रमाणे आज जिह्यात सर्वच मतदार संघात गृह मतदानास सुरुवात होणार आहे.