मंडणगड:-मंडणगड व बाणकोट पोलीस स्थानकाच्यावतीने 5 नोव्हेंबर रोजी अनधिकृत मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंडणगड पोलीस स्थानकात कॉन्स्टेबल दत्तात्रय पिसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 5 नोव्हेंबर रोजी दत्ताराम नांदवीकर (34, म्हाप्रळ, मंडणगड) हा सायकांळी 4.25 वा. म्हाप्रळ-कुंभार्ली येथे विनापरवाना 910 रुपये किंमतीच्या 9 लिटर गावठी दारुसह आढळला. त्यायावर मंडणगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसा बाणकोट पोलीस स्थानकाचे हेडकॉन्स्टेबल विकास वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 5 नोव्हेंबर रोजी शिपोळे गावालगत संतोष भागणे (45) हा विनापरवाना 910 रुपये किंमतीच्या 9 लिटर गावठी दारूसह आढळला. त्याच्यावर बाणकोट पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.