विधानसभा निवडणुकीसाठी राज्य परिवहन महामंडळी तयारी
रत्नागिरी:-विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे पोहोचवण्यासाठी आणि मतदानानंतर मतमोजणी केंद्रांवर ते परत नेण्यासाठी राज्यभरात 8,987 एसटी बसचची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हयासाठीही राज्य परिवहन महामंडळाने 260 एसटी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था ठेवली आहे. त्यामुळे निवडणूक काळात पोलीस यंत्रणेला पुरेसा वाहतूक आधार मिळेल.
या गाडया 19 व 20 नोव्हेंबर रोजी प्रासंगिक करारावर देण्यात येणार आहेत. या कालावधीत निवडणूक साहित्य व मतदान यंत्रांची वाहतूक करण्याचे महत्त्वपूर्ण काम या बसद्वारे केले जाणार आहे. याशिवाय 245 अतिरिक्त बस पोलीस प्रशासनासाठीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एसटीकडे सध्या स्वतच्या एकूण 13,367 बस आहेत. त्यांपैकी 9232 बस राज्यातील विविध 31 विभागांतून निवडणुकीच्या कामासाठी तैनात केल्या जातील. मुंबईसह संपूर्ण राज्यात यासाठी व्यवस्थापन केले जाणार आहे.
प्रवासी वाहतुकीवर परिणाम नाही
प्रशासनाच्या माहितीनुसार, बसची मागणी ठराविक कालावधीसाठी आहे. त्यामुळे या प्रासंगिक कराराचा नियमित प्रवासी वाहतुकीवर परिणाम होणार नाही. त्यामुळे रोजच्या प्रवाशांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.