रत्नागिरी:-तालुक्यातील चाफेरी-पाटीलवाडी येथे चोरट्याने घर फोडून 2 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 च्या सुमारास घडली. राजेश रवींद्र पाटील (43, ऱा चाफेरी-पाटीलवाडी, रत्नागिरी) यांच्या मालकीचे हे घर असून त्यांनी जयगड पोलिसात तक्रार दाखल केली.
चोरीला गेलेल्या मुद्देमालात 30 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र व 65 हजार रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे. राजेश पाटील यांचे चाफेरी- पाटीलवाडी येथे घर असून 12 नोव्हेंबरला चोरटयाने त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच घरामधील देवघरात असलेल्या लोखंडी कपाटातील 30 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र व 65 हजार रुपयांची रोकड चोरून नेली, अशी तक्रार जयगड पोलिसात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चोरटयाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 331(3),305 नुसार गुन्हा दाखल केला.