रायगड : जिल्ह्यातील पेण तालुक्यात असलेल्या म्हाडा कॉलनी रिंग रोड येथे १ लाख ७५ हजार ८४० रुपयांच्या गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या काळामध्ये बेकायदेशीर आंबडी पदार्थाचा साठा करणे वाहतूक करणे यावर विशेष मोहीम उघडण्यात आली होती या मोहिमेअंतर्गत सदरची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोलीस नाईक राजेश पवार यांना त्यांच्या बातमीदाराकडून एक किसन गांजाची विक्री करण्याकरता येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. पेण तालुक्यातील फणस डोंगरी येथील म्हाडा नवीन वसाहती मध्ये सुशील राजाराम जोशी हा गांजा नावाचा अगदी पदार्थ स्कूटरवरून घेऊन येणार आहे आणि त्याची विक्री करणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पेण उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी म्हाडा कॉलनी मध्ये सापळा तयार केला, थोड्या वेळाने आरोपी सुशील जोशी हा त्याच्या स्कूटरवरून जात असताना त्याला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, दरम्यान तो पळून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून १ लाख ७५ हजार ४४० रुपये किमतीचा गांजा मुद्देमाल सह जप्त करण्यात आला, सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत करीत आहेत.