संगमेश्वर:- चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ हा आजही अविकसित आहे. अनेक सोयी सुविधा पासून येथील नागरिक वंचित आहेत.आरोग्यसेवा, रोजगार, शेती विकास आणि शिक्षणाच्या समस्या या भागात आहेत. या भागातील सर्वसामान्य कुटुंबातील महिला व नागरिकांच्या हक्कासाठी गाव विकास समितीच्या उमेदवार अनघा कांगणे यांना विजयी करा असे आवाहन गाव विकास समितीच्या महिला अध्यक्ष दीक्षा खंडागळे गीते यांनी केले आहे.
गाव विकास समिती संघटनेने चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात अनघा कांगणे यांना उमेदवारी दिली आहे अनघा कांगणे यांना शिट्टी ही निशाणी मिळाली असून चिपळूण संगमेश्वर च्या सर्वांगीण विकासासाठी शिट्टी या चिन्हा समोरील बटन दाबून अनघा कांगणे यांना विजयी करा असे आवाहन दीक्षा खंडागळे गीते यांनी केले आहे.. चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये आरोग्य, रोजगार संबंधित समस्या भेडसावत असतात. महिलांच्या हक्क अधिकारांसाठी अनघा कांगणे या काम करतील असा विश्वासही दीक्षा खंडागळे गीते यांनी व्यक्त केला आहे.