रत्नागिरी:-तालुक्यातील भोके येथे आज बिबट्याने पहाटेच्या सुमारास पाड्यावर हल्ला करून ठार मारल्याने परिसरात खळबळ उडाली. भर वस्तीत पाड्यावर बिबट्याने हल्ला केल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सविस्तर वृत्त असे की, भोके येथे महादेव तुळजा रेवाळे (भोके रेवाळेवाडी), यांचा घरापासून काही अंतरावर गोठा आहे. त्यांच्या या गोठ्यात महिन्याभरापूर्वी या गायीने एका पाड्याला जन्म दिला होता. हा पाडा गोठ्यात असताना बुधवार 13 नोव्हेंबर रोजी पहाटे पहाटेच्या सुमारास बिबट्याने पाड्यावर हल्ला चढवला. गुरांच्या हरंबरड्याने रेवाळे यांच्यासह ग्रामस्थ जागे झाले. त्यांनी गोठ्याकडे धाव घेतली असता बिबट्याच्या हल्ल्यात पाड्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे. मात्र अद्यापही वनविभाग अधिकारी घटनास्थळी दाखल झाले नाही. भर वस्ती बिबट्याने हल्ला केल्याने भीतीचे वातावरण आहे.
याआधी ही या वाडीत बिबट्याने एक बकरा मारला होता. आणि पाड्याला मारले आहे. ही दुसरी घटना घडलेली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.