लांजा:- येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मानवी साखळीतून मतदान जनजागृती करण्यात आली.
विधानसभा निवडणूक येत्या २० नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. लोकशाहीच्या या मोठ्या उत्सवात मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी जोरदार जनजागृती स्वीप टीमच्या वतीने करण्यात येत आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तसेच स्वीप टीमचे प्रमुख विनोद सावंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतदान जनजागृती राजापूर मतदारसंघात होत आहे.
लांज्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तयार करण्यात आलेल्या मानवी साखळीत प्राचार्य सुनील पाटोळे, उपप्राचार्य श्री. आसगावकर, पर्यवेक्षक मंगेश वाघाटे, अनिल कांबळे, इतर सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, स्वीप टीमचे विजय विश्वासराव, दिलीप चव्हाण, प्रदीप मडवी, सुनील खांडेकर, महादेव बंडगर उपस्थित होते.