रत्नागिरी : तालुक्यातील झरेवाडी येथील एका वृद्धाने विषारी द्रव प्राशन केल्याने अस्वस्थ वाटू लागल्यानंतर उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यशवंत लक्ष्मण गोताड (70, रा. झरेवाडी, रत्नागिरी) असे विष द्रव प्राशन केलेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना रविवार 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वा. सुमारास झरेवाडी येथे घडली. यशवंत गोताड यांनी शेतात असताना कोणत्यातरी अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केले. काही वेळानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यनंतर त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.