रत्नागिरी:-‘हापूस‘च्या नावाखाली होत असलेल्या बोगस विक्रीला बागायतदारांकडून विरोध होत आहे. मात्र ही नोंदणी करण्यासाठी जीआय देणाऱ्या संस्थांना बागायतदारांचे मेळावे घ्यावे लागत आहेत. आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात 900 बागायतदार, 140 प्रक्रिया व्यावसायिक यांनी जीआयची नोंदणी केलेली आहे.
हापूसच्या नावाने बोगस विक्री रोखण्यासाठी कोकण हापूसच्या नावावर ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी कोकण हापूसला भौगोलिक निर्देशांक (जीआय मानांकन) देण्यात आले आहे. रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील हापूसला 3 वर्षांपूर्वी जीआय मानांकन मिळाले आहे. देवगडचा हापूस आंबा ‘देवगड हापूस‘ तर रत्नागिरीचा हापूस ‘रत्नागिरी हापूस‘ नावाने ओळखला जात आहे. रत्नागिरी व देवगड हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळाल्याने या आंब्याच्या नावाखाली कर्नाटक हापूस आंबा विकता येणार नाही. मात्र, त्यासाठी बागायतदारांना जीआय मानांकनासाठी अधिकृत नोंदणी करणे गरजेचे आहे. ही नोंदणी केल्यानंतर बागायतदारांना जीआय टॅग लावून आंबा विक्रीसाठी पाठवता येतो. फळासोबत लावलेला बारकोड स्कॅन केल्यानंतर मोबाइलमध्ये फळाचे उत्पादक व प्रक्रिया उद्योगाची माहिती मिळणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात 65 हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड आहे. जिल्ह्यात 20 हजार बागायतदार आहेत. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिह्यात 31 हजार 250 हेक्टर क्षेत्र असून, 34 हजार 450 बागायतदार आहेत. मात्र, जीआय नोंदणीसाठी अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे. कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादन विक्रेते सहकारी संस्था, केळशी परिसर आंबा उत्पादक संघ, देवगड आंबा उत्पादक संघ हे जीआय मानांकन नोंदणीसाठी बागायतदारांकडे पाठपुरावा करत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात 900 बागायतदार, 140 प्रक्रिया व्यावसायिक तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 799 बागायतदारांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात 900 बागायतदार, 140 प्रक्रिया व्यावसायिक तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 799 बागायतदारांनी नोंदणी केली आहे. तर कोकणातील पाच जिल्ह्यातील 1 हजार 839 बागायतदारांनी जीआय नोंदणी केली असून, मानांकन घेण्यात हापूस राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.