तुषार पाचलकर / राजापूर
राजापूर शहरातील विठ्ठल राम पंचायत मंदिरामध्ये श्री देव कार्तिक स्वामी दर्शनयोग शुक्रवार दि. 15 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 9 वा. 54 मि. सुरु होत असून उत्तररात्री 2 वा. 57 मि. पर्यंत आहे. या कालावधीत मंदिर खुले राहणार आहे.
यावर्षी कार्तिक स्वामी दर्शन योग कार्तिक पौर्णिमेला असून त्यासाठी संभाजी पेठ मित्रमंडळ, भक्तवत्सल भक्तीभाव मंडळ यांच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. कार्तिक स्वामी दर्शन या दिवशी सोडुन महिलाना वर्ज्य असते. मात्र या कालावधीत महिलानाही दर्शन घेता येते असा प्रघात आहे. त्यानिमित्ताने शहर बाजापेठेतील श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिरात परिवारासह असणाऱ्या श्री शंकराच्या मंदिरात दर्शन योगाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकानी या कालावधीत दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संभाजी पेठ मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.