दापोली:-महाआघाडी दापोली विधानसभेचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचाराकरीता शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे 14 नोव्हेंबर रोजी दापोली दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता शहरातील शिवस्मारकासमोर आझाद मैदान येथे जाहीर सभेचे नियोजन करण्यात आले आहे.
दापोली विधानसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय कदम यांची शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार योगेश कदम व मनसेचे उमेदवार संतोष अबगुल यांच्यात मुख्य लढत होणार आहे. त्यामुळे महाआघाडीचे दापोलीतील उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारार्थ शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवस्मारकासमोर आझाद मैदान येथे जाहीर सभेचे नियोजन करण्यात आले आहे. ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सभेला मोठी गर्दी होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.