खेड:-तालुक्यातील बोरघर- ब्राह्मणवाडीनजीक घराच्या पाठीमागील आंब्याच्या झाडाजवळ बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यावर येथील पोलीस पथकाने धाड टाकून 3700 रूपयांचा ऐवज जप्त केला.
अविनाश नारायण चव्हाण (53, रा. बोरघर-ब्राह्मणवाडी) याच्यावर रविवारी रात्रीच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो रविवारी सायंकाळच्या सुमारास गावठी हातभट्टीच्या दारूची विनापरवाना विक्री करत होता. याबाबत माहिती मिळताच पथकाने धाड टाकून 35 लिटर गावठी हातभट्टीच्या दारूसह रंगेहाथ पकडले. यापूर्वी देखील त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती.