रत्नागिरी:-राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार शेखर निकम यांचा प्रचार करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आह़े. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकुर यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आह़े. वंचितने कुणालाही पाठिंबा दिलेला नसून पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका या पदाधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आह़े.
वंचित बहुजन आघाडी चिपळूण तालुकाध्यक्ष महेश सकपाळ, सचिव विलास मोहिते, उपाध्यक्ष नाना सावंत व बुद्धघोष गमरे अशी हकालपट्टी करण्यात आलेल्यांची नावे आहेत़. वंचित बहुजन आघाडीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रानुसार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार शेखर निकम यांना वरील पदाधिकाऱ्याकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला होत़ा. संबंधित पदाधिकाऱ्यांना अशाप्रकारे निर्णय घेण्याचा अधिकार नाह़ी. हा पक्षशिस्तीचा भंग असल्याचे या पत्रकात म्हटले आह़े.