रत्नागिरी:-तालुक्यातील गोळप गोठणेवाडी येथे गावठी दारु बाळगणाऱ्या संशयितावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल़ा. ही कारवाई रविवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली .रविंद्र हरी शेडगे (49, ऱा नालेवठार पावस) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी 9 लिटर गावठी दारु हस्तगत केली.
गोळप येथे बंदी असलेल्या गावठी दारुची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 10 नोव्हेंबर रोजी गोळप गोठणेवाडी येथे पोलिसांनी छापा टाकून कारवाई केल़ी. यावेळी संशयित आरोपी याच्या ताब्यात पोलिसांना 9 लिटर गावठी दारु आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी संशयिताविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 ई नुसार गुन्हा दाखल केला.