तुषार पाचलकर / राजापूर
राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसनं पक्षाच्या वतीने 16 बंडखोर उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे. बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या 16 उमेदवारांची 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबन केल्याचे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून पक्षानं बंडखोरांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे.
यामध्ये रत्नागिरी जिल्हा काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष व बंडखोर उमेदवार अविनाश लाड यांचाही समावेश आहे यावर आपली प्रतिक्रिया देताना अविनाश लाड यांनी आमची लढाई ही काँग्रेस पक्ष वाचवण्याची लढाई आहे, गेल्या पंधरा वर्षात, रोजगार, शिक्षण, महिलांचे प्रश्न आहेत असे अनेक प्रश्न आहेत जे मार्गी लागले नाहीत जे मला मार्गी लावायचे आहेत यासाठी मी ही लढाई लढत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.