विकासाच्या मुद्द्यावरून अनघा कांगणे यांचा विरोधकांवर हल्लाबोल
संगमेश्वर:- विद्यमान आमदार शेखर निकम हे मागील पाच वर्षापासून चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात विकासाचे प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरले आहेत.त्यांनी आरोग्य, शिक्षण, रोजगार,शेती विकास या क्षेत्रात कोणतेही काम केलेले नाही. संगमेश्वर तालुक्याच्या आरोग्यवस्थेकडे तर शेखर निकम यांनी पूर्णतः दुर्लक्षच केल्याचे गाव विकास समितीच्या उमेदवार अनघा कांगणे यांनी म्हटले आहे.
मागील पाच वर्षात सभामंडप, पाखाड्या यामध्येच विद्यमान आमदारांचा विकास गुंतून राहिला होता.त्यांच्या विकासाच्या व्याख्येमध्ये चिपळूण संगमेश्वर मधील आरोग्यवस्था सक्षम करणे, एमआयडीसी विकसित करणे, शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि शेती विकास करणे हे मुद्देच नसल्याचे स्पष्ट झाले असून पाच वर्ष आमदार राहिल्यानंतर निकम हे आता नागरिकांना विकासाची आश्वासन देत आहेत.मग पाच वर्षात त्यांनी काय केले असा सवालच सौ अनघा कांगणे यांनी उपस्थित केला आहे. विधानसभेत चिपळूण संगमेश्वर मधील महत्त्वाच्या प्रश्नांवर आवाज उठवणे अपेक्षित असताना देवरूख संगमेश्वर रस्त्याबाबत मात्र शेखर निकम कायमच गप्प बसून राहिले हा रस्ता खराब होऊनही त्यावर त्यांनी कधीच प्रश्न उपस्थित केले नाहीत.चिपळूण संगमेश्वर मधील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडित असणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांना निकम यांनी न्याय दिला नाही असेही अनघा कांगणे यांनी म्हटले आहे.त्याचबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार हे सहा महिन्यापूर्वी मतदारसंघात धनसंपत्तीच्या जोरावर निवडणुका लढण्यासाठी आले असून त्यांनाही मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जाण नसल्याचे अनघा कांगणे यांनी म्हटले आहे.दोन्ही उमेदवार हे धनसंपत्तीच्या जोरावर निवडणुका लढत असून सर्वसामान्य नागरिकांनी यावेळी गाव विकास समितीला संधी द्यावी असेही अनघा कांगणे यांनी म्हटले आहे.
त्यामुळे यावेळी मत मागताना त्यांना मतदारसंघात प्रतिसाद मिळत तर दुसरीकडे प्रशांत यादव हे सुद्धा अलीकडेच मतदारसंघात वावरू लागल्याने व लोक हिताचे प्रश्न त्यांनी सरकार दरबारी लावून धरले नसल्याने सुदान नागरिकांत त्यांनाही तितकासा प्रतिसाद मिळत नसल्याने या दोन्ही उमेदवारांकडून धनसंपत्तीचा वापर होऊ शकतो असेही अनघा कांगणे यांनी म्हटले आहे.