रत्नागिरी:-आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष परेश प्रताप साळवी यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
श्री. सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यात केलेल्या विकासकामांनी प्रभावित होऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले. शिवसेनेच्या जनसेवेच्या कार्यामुळे आणि पक्षाच्या विकासाच्यादृष्टीने ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असे ते म्हणाले. श्री. सामंत यांनी परेश साळवी यांचे स्वागत केले.