चिपळूण : तालुक्यातील कामथे खुर्द-हरेकरवाडी येथे एका प्रौढाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात शुक्रवारी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धोंडू बाबू सोलकर (57, कामथे खुर्द-हरेकरवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धोंडू सोलकर यांनी त्यांच्या घराच्या हॉलमध्ये मध्यभागी असणारा पंखा लावण्यासाठी ठेवलेल्या लोखंडी हुकाला नायलॉनच्या दोरीने फळफास घेऊन आत्महत्या केली. सोलकर यांनी कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली, याचे कारण समजू शकलेले नाही.