एस.टी., ट्रक, कार, दुचाकिमध्ये अपघात, धुक्यामुळे घाटात समोरील वाहन दिसत नसल्यामुळे अपघात
चिपळूण- मुंबई- गोवा महामार्गावरील चिपळूण मधील परशुराम घाटात चार वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना आज रविवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास घडली. घाटात धुक्यामुळे समोरील वाहने दिसत नसल्यामुळे हा अपघात झाला.एस. टी. , कार, ट्रक, दुचाकी यांच्यात हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की एसटीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातामुळे दुचाकी आणि एसटी बसमधील प्रवाशी जखमी झाले झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेत. या अपघातातील जखमींना आता उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. मात्र अपघातात किती जखमी झालेत याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
कोकणात सध्या थंडी पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पहाटे धुक्याचे साम्राज्य असते. या धुक्यामुळे अपघाताच्या घटना वाढत चालल्या आहेत. अशात आज मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड आणि चिपळूणला जोडणाऱ्या परशुराम घाटात चार वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे.
एसटी बस, ट्रक, कार आणि दुचाकी या अशा चार वाहनांनी एकमेकांना भीषण धडक दिली. या धडकेत एसटीचा अक्षरश चक्काचूर झाला आहे. तसेच एसटी आणि दुचाकीवर असलेले चार जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या जखमींना आता उपचाराकरता रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यामुळे सध्या या प्रवाशांवर उपचार सूरू आहेत. या अपघातानंतर महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या अपघातानंतर सध्या मुंबई गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सूरू ठेवण्यात आली आहे. तसेच दाट धुक्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.