दोन दिवसात 4 अपघातात 8 गाड्यांचे नुकसान, 7 जखमी
प्रशांत कांबळे/पांगरी:-रत्नागिरी देवरुख मार्गावर शनिवार 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास व्हॅगनार कार आणि टेम्पो ट्रॅव्हलर यांच्यात पांगरी येथे समोरासमोर अपघात झाला. या अपघातात 4 जण जखमी झाले. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान काल शुक्रवार 8 नोव्हेंबर रोजी ही दुपारच्या सुमारास क्रेटा कार आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला होता. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला होता. तसेच दुसऱ्या एका अपघात ट्रॅव्हलर गाडीचा अपघात झाला होता. दोन दिवसात 4 अपघातात 8 गाड्यांचे नुकसान झाले असून 7 जण जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शनिवार 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास देवरूखहून रत्नागिरीच्या दिशेने व्हॅगनार कार चालली होती. याच दरम्यान रत्नागिरीहून देवरुखच्या दिशेने टेम्पो ट्रॅव्हलर जात असताना पांगरी येथील अवघड वळणावर बौध्दवाडी येथे दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात झाला. या अपघात व्हॅगनार कारमधील चार जण किरकोळ जखमी झाले. या मध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश होता. जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत. अपघाताची माहिती मिळताच पांगरी येथील ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. त्यांनी जखमींना मदत केली. या मार्गावर वारंवार अपघात होत आहेत. दरम्यान काल शुक्रवार 8 नोव्हेंबर रोजी ही या मार्गावर पांगरी येथे क्रेटा कार आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला होता. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला होता. तसेच काल रात्री दुसऱ्याही एका ट्रॅव्हलरचा अपघात याच ठिकाणी झाला होता. पुन्हा आज शनिवार सकाळी बोलेरो गाडीचा अपघात झाला.
दरम्यान हा मार्ग वाहतुकीसाठी उत्तम असल्यामुळे वाहने सुसाट वेगाने चालवली जातात. मात्र येथील अवघड वळणांचा अंदाज न आल्याने वारंवार अपघात घडत आहेत. दोन दिवसात 4 अपघातात 8 गाड्यांचे नुकसान, 7 जखमी झाले आहेत. यामध्ये गाड्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील अपघातांना आळा घालण्यासाठी सा. बा. विभागाने उपाययोजना करून स्पीड ब्रेकर टाकावेत. त्याची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांतून होत आहे.