रायगड:-मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघाताची मालिका सुरु असतानाच आज पुन्हा पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. पहाटे कोल्हापूरवरुन मुंबईकडे येणाऱ्या खासगी बसने अन्य एका वाहनाला जोराने धडक दिल्यामुळे अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.यामध्ये १५ प्रवाशी जखमी झाले असून ८ जणांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रायगड जिल्ह्यातील मुंबई पुणे एक्सप्रेस वे जवळ खोपोली गावाच्या हद्दीत पहाटे चार वाजता सदरचा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी रवाना झाले आणि त्यांनी बचाव कार्याला सुरुवात केली.
या अपघातामध्ये १५ जण जखमी झाले आहेत. जखमीमधील ८ जणांची प्रकृती चिंताजनक असून सर्व जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे. या प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे त्यांच्यावर डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु केले आहेत. सदरची बस कोल्हापूर वरून मुंबईच्या दिशेने जात होती. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.…या भीषण अपघातामध्ये १५ प्रवाशी जखमी झाले आहेत.
अपघातग्रस्त वाहने रहदरीच्या मार्गावरून बाजूला काढण्यात आली असल्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.महामार्ग वाहतूक पोलीस केंद्र ,बोरघाट आणि खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तातडीने पोहोचले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.