संगमेश्वर : संगमेश्वर व चिपळूण या दोन रेल्वे स्थानकावर तीन महत्वपूर्ण रेल्वे ना थांबे द्या अशी मागणी निसर्गरम्य संगमेश्वर चिपळूण या ग्रुप तर्फे करण्यात आली.
केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांची निसर्गरम्य संगमेश्वर चिपळूण या गृपच्या सदस्यानी भेट घेतली. यावेळी रेल्वे गाड्यांच्या थांब्यांसह कोंकण रेल्वे शी संबधित विविध विषयांवर चर्चा झाली.
रेल्वे क्रमांक ११०९९/१११०० लोकमान्य टिळक टर्मिनल्स मडगाव एक्सप्रेस,रेल्वे क्रमांक १९५७७/१९५७८ जामनगर तिरूनलवेली एक्सप्रेस,रेल्वे क्रमांक २०९०९/२०९१० कोचुवेली पोरबंदर एक्सप्रेस या गाड्यांना संगमेश्वर व चिपळुन येथे येता जाता थांबे मिळावेत यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विन वैष्णव यांच्या शी सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले.
केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांची आज संगमेश्वर रेल्वे स्थानकांवर ३ गाड्यांच्या थांब्याच्या प्रलंबीत मागणी विषयी निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर या गृपच्या सदस्यानी भेट घेतली.या वेळी अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आणि यावर आपण योग्य ती कार्यवाही करू असे यावेळी श्री वैष्णव यानी सांगितले.या प्रसंगी ग्रुप चे प्रमुख संदेश जिमन,समीर सप्रे,दीपक पवार, गणपत दाभोलकर,जगदीश कदम अशोक मुंडेकर आणि मुकुंद सनगरे उपस्थित होते. आपल्या व्यस्त वेळापत्रकातुन वेळ काढुन सविस्तर चर्चा केल्याबद्दल श्री अश्विनी वैष्णव यांचे संगमेश्वर तालुक्याच्या वतीने आभार मानले.