देवरुख:-चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारासाठी सिनेअभिनेते भाऊ कदम १० नोव्हेंबरला देवरूख नगरीत येणार आहेत.
सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत देवरूख बाजारपेठेतून प्रचार रॅली निघणार आहे. रविवारी देवरूख नगरीत आठवडा बाजार भरतो. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो ग्राहक खरेदीसाठी देवरूख नगरीत येतात. या प्रचारात महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देवरूखची ग्रामदेवता श्री सोळजाई देवीचा महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांनी शुभाशीर्वाद घेतला. महायुतीचे उमेदवार विजयी होवोत, असे गाऱ्हाणे सोळजाई देवीला घालण्यात आले. या प्रसंगी भाजपाचे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव, माजी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, माजी नगरसेवक सदानंद भागवत, प्रफुल्ल भुवड, भाजपा तालुकाध्यक्ष रूपेश कदम, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अभिजित शेट्ये यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.