रत्नागिरी:-रत्नागिरीतील लोकनेते शामराव पेजे शासकीय महाविद्यालय येथे शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी 1 च्या सुमारास उघडकीस आली. ज्ञानेश्वर शिवराम वरपडे (22, ऱा नूतननगर रत्नागिरी, मुळे रा.नांदेड) असे मृताचे नाव आहे. ज्ञानेश्वर याने नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट होवू शकलेले नाही.
ज्ञानेश्वर हा मुळचा नांदेड येथील रहिवासी असून तो लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. 7 नोव्हेंबर रोजी दुपारी ज्ञानेश्वर याचा मित्र त्याला भेटण्यासाठी नूतननगर येथे तो राहत असलेल्या घरी आला. यावेळी ज्ञानेश्वर याचा मृतदेह रुमच्या छताचे लोखंडी अँगलला गळफास घेतलेल्या स्थितीत मिळून आला, अशी नोंद पोलिसात करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.