खेड:-तालुक्यातील साखर येथील महिलेचा पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये आकस्मिक मृत्यू झाला. ही महिला 28 ऑक्टोबर रोजी रात्री 10.30 वाजता खोकल्याचे औषध समजून गवत मारण्याचे ओझोन नावाचे औषध प्यायली होती. तिला त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर बनल्याने मुंबई जे. जे. व त्यानंतर पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाला. या बाबत रुग्णालय प्रशासनाने येथील पोलीस ठाण्यात कळवल्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.