खेड:-तालुक्यातील लोटेमाळ येथील एका महिलेची 25 हजारांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानुसार गुरुवार 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी उशिरा अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.20 ते 6.25 या कालावधीत घडली.
लोटेमाळ येथील श्री एंटरप्रायझेस् मनी ट्रान्स्फर कार्यालयात येऊन महिलेच्या कार्यालयातील एअरटेल मोबाईल नंबरच्या एअरटेल वॉलेट मनी अकौंटमधून एस बँकेच्या खात्यातून 25 हजार रुपये ट्रान्स्फर करण्यास सांगितले. मात्र, ती रक्कम महिलेच्या खात्यावर जमा न करता कार्यालयातून निघून जात त्याने फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.