दापोली : तालुक्यातील दाभिळ पांगरी येथे अनंत महादेव सकपाळ (59, पांगारी बौद्धवाडी) याच्यावर अवैधरित्या दारू बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 12ः30 वाजण्याच्या सुमारास दाभिळ-पांगरी रोड नवाशेत येथे झाडा-झुडपाच्या आडोशाला अनंत सकपाळ आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे विनापरवाना सुमारे 8 लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळली. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच गावतळे-भडवळे रस्त्यावर नारायण राजाराम कलमकर (36, कोळबांद्रे कुंभारवाडी) हा गावतळे-दत्तवाडी येथे 7 रोजी संध्याकाळी 6ः30 वाजण्याच्या सुमारास संशयितरित्या आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ सुमारे 9 लिटर गावठी हातभट्टीची दारू विनापरवाना आढळून आली. याप्रकरणी त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणाचा तपास दापोली पोलीस करीत आहेत.