रत्नागिरी:-रत्नागिरी शहरातील कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र येथे नि:शुल्क योगाचे आयोजन केले आहे. हा योग अभ्यासक्रम 11 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत सायंकाळी 5 ते 5.30 या वेळेत घेतला जाणार आहे.
या अभ्यासक्रमात आसने, प्राणायाम घेण्यात येणार असून योग प्रात्यक्षिकांचे पद्धतशीर ज्ञान रत्नागिरीकरांना मिळणार आहे. हा अभ्यासक्रम मोफत असल्याने केवळ आपल्याला वेळेची गुंतवणूक करावी लागणार आहे. कामाच्या व्यस्ततेतून आपल्या आरोग्यासाठी वेळ देण्याची ही सुवर्ण संधी रत्नागिरीकरांना मिळणार आहे.
हा अभ्यासक्रम अरिहंत मॉल येथील रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात होणार आहे. इच्छुकांनी (7798490615) या क्रमांकावर संपर्क त्वरित साधावा.