रत्नागिरी : पडद्यामागे राहून समाज सेवा करणारे सामाजिक कार्यकर्ते, अनेक गोरगरीब लोकांच्या मदतीला धावून येणारे, प्रसिद्धीपासून दूर असलेले संगमेश्वर तालुक्यातील कोंडये गावचे सुपुत्र श्री. सुरेश दसम यांचा ग्रामीण वार्ता या डिजिटल मीडिया तर्फे नुकताच शेताच्या बांधावर जावून सन्मान करण्यात आला. अशा प्रकारचा सत्कार करणारं ग्रामीण वार्ता हे पहिलंच डिजिटल माध्यम ठरलं आहे.
यावेळी बोलताना दसम म्हणाले, ‘ग्रामीण वार्ता’ने प्रथमच मला प्रकाशझोतात आणले आहे. आजपर्यत 15-20 वर्षे आपण समाज सेवा करत आहोत. ग्रामपंचायत सदस्य पद ही भूषवले आहे. लोकांची अनेक कामे केली परंतु आजपर्यत असा कुणीही आपला सन्मान केला नाही. ग्रामीण वार्ता ने प्रथमच आपला सन्मान केला. ग्रामीण वार्ताच्या बातम्या वाचनीय असतात. बातम्यांची हेडिंग ही सर्वसामान्य व्यक्तीला समाजतील अशा प्रकारची असतात. बातम्यांची मांडणी सुबक असते आणि ग्रामीण भागासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या घटनांच्या बातम्या आणि सर्व प्रकारच्या बातम्या इथे वाचायला मिळतात. लोकांच्या उपयुक्त आणि आरोग्य विषयक घरगुती उपाय कसे करावेत याची ही माहिती येथे वाचायला मिळते. त्यामुळे ग्रामीण वार्ता हे एक चांगल माध्यम आहे असे ते म्हणाले.
खाडीपट्ट्यातील सुरेश दसम हे सजग व जागरूक नागरीक आहेत. ते नियमित राज्यातील बातम्यांबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील बातम्यांचे बारकाईने वाचन करत असतात. त्याचबरोबर ग्रामीण वार्ता या डिजिटल मीडियाचेही ते नियमित वाचक आहेत. नावाप्रमाणेच ‘ग्रामीण वार्ता’च्या बातम्या ग्रामीण भागातील विविध लोकांपर्यत पोचवत असतात. आपल्या मित्रपरिवाराला त्यांनी ग्रामीण वार्ताशी जोडले आहे.
ग्रामीण वार्ता हे माध्यम ग्रामीण, खेड्यातल्या लोकांना फार जवळचे वाटते. ग्रामीण भागातील तसेच देश विदेशातील बातम्या ग्रामीण वार्ता आपल्या डिजिटल मीडियावर प्रसिद्ध करत असते. श्री.सुरेश दसम हे आपल्या माध्यमातून खेडोपाड्यात ग्रामीण वार्ताच्या बातम्या पोचवत असतात. याची दखल घेत ग्रामीण वार्ताचे संपादक मुझम्मील काझी यांनी शेताच्या बांधावर जाऊन गौरव पत्र आणि भेटवस्तू देऊन सत्कार केला. त्यांच्यासोबत पत्रकार समीर शिगवण, प्रेषिता करदोडे, विघ्नेश करदोडे उपस्थित होते.