चिपळूण:-सावर्डे-कासारवाडी कोष्टेवाडी व शहरातील पाग येथील दारूअड्डयावर धाडी टाकून पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.
6 नोव्हेंबर रोजी 2.30 वाजता कासारवाडी-कोष्टेवाडी येथील नदीकिनारी मनोहर बाळाजी गुरव (48, सावर्डे-डेरवणफाटा-पवार कॉलनी) हा दारू विकत असल्याची माहिती सावर्डे पोलिसांना मिळाली. त्यानुसार येथे छापा मारला असता त्याच्याकडे 53 हजार रुपये किंमतीचे 1400 लिटर रसायन, 2 हजार 200 रुपयांची 20 लिटर दारु, 2 हजार रूपयांचा पत्र्याचा डेग, 100 रुपये किंमती स्टीलची परात असा 57 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल सापडला. त्यामुळे गुरव याच्यावर सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शहरातील पाग परिसरातील बंद घराच्या आडोशाला 6 रोजी रात्री 8.15 वा. विजय बाळू चव्हाण (34, पाग) हा गावठी दारू विकत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी येथे छापा मारला असता त्याच्याकडे 1650 रुपये किंमतीची 16 लिटर दारु सापडली. चव्हाण यायावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.