खेड:-शहरातील स्वरूपनगर येथे एकाच रात्रीत तीन फ्लॅट फोडून चोरटयानी फोडण्याची घटना घडली. यातील दुसऱ्या फ्लॅट मध्ये चोरट्यांनी दागिन्यांसह रोकड लंपास केली. या प्रकाराने पोलिसांची झोपच उडवली आहे. या चोरीप्रकरणी गुरुवारी सायंकाळी उशिरा येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे काम सुरू होते.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्वरूपनगर येथील आयडल ह्यू अपार्टमेंटमधील एक फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्या फ्लॅटधारकाच्या कार्यालयातून चोरटयाच्या हाती काहीच लागले नसल्याचे समजते. यानंतर चोरटयानी आपला मोर्चा समोरील बेग अपार्टमेंटमध्ये वळवला.
या इमारतीतील फ्लॅट बंद असल्याची संधी साधत डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. तर तिसऱ्या फ्लॅटमधून 10 ते 13 हजाराची रोकड लंपास झाल्याचे समजते. एकाच रात्रीच झालेल्या घरफोडयानी येथील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. घरफोडया करणाऱ्या चोरटयाचा शोध घेण्याचे आव्हान येथील पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.