रत्नागिरी:-राजापूर-साखर येथे फिट येण्याच्या आजाराला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रुपेश कृष्णा राडये (32, रा. राजापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास साखर आंबेरवाडी येथील राहत्या घरी घडली. रुपेश याला लहानपणापासून फिट येण्याचा आजार होता. आजारपणाला कंटाळून त्याने घरात कुणीही नसल्याचे पाहून स्वत:हून नायलॉन रस्सी घराच्या मागील पडवीत छताच्या लोखंडी वाशाला बांधून गळफास घेतला, अशी नोंद पोलिसात करण्यात आली आह़े.