चिपळूण:-चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज चिपळूण दौऱ्यावर येत असून सकाळी १० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील मैदानात महाविकास आघाडीची प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे निरीक्षक बबन कनावजे, प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार रमेश कदम, माजी पालकमंत्री रविंद्र माने, माजी आमदार सुभाष बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, शिवसेना उबाठा रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, उत्तर रत्नागिरी सहसंपर्कप्रमुख सचिन कदम, उपजिल्हाप्रमुख प्रताप शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाच्या नेत्या नलिनी भुवड, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ बारक्याशेठ बने, काँग्रेसचे नेते सहदेव बेटकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. दीपिका कोतवडेकर, काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. विभावरी जाधव, शिवसेना उबाठा महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. अरुणा आंब्रे, महिला जिल्हा संघटक वेदा फडके यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या सभेला महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मतदारबंधू-भगिनींनी उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत, चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख विनोद झगडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष लियाकत शाह, शिवसेना उबाठा संगमेश्वर तालुकाप्रमुख बंड्या बोरूरकर, काँग्रेसचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष दत्ता परकर आदींनी केले आहे.