गुहागर:-तालुक्यातील मुंढर पूर्व आग्रेवाडी येथे चोरटयांनी घराचे कुलूप तोडून टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिनसह १ लाख २१ हजार ५०० चे चोरी केल्याची घटना १५ जुलै ते ५ नोव्हेंबर दरम्याने घडली. याबाबतची फिर्याद वसंत रामचंद्र आग्रे (मुंढर, पूर्व आग्रेवाडी, गुहागर) यांनी पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसंत आग्रे हे जुलै ते नोव्हेंबर दरम्यान मुंबईला गेलेले असताना अज्ञाताने बंद घराचे कुलुप फोडून घरातील किमती वस्तू चोरुन नेल्या. ५ नोव्हेंबर रोजी ते गावी आले असता. घराचा दरवाजा फोडून ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले. यामध्ये २५ हजाराचा फ्रीज, २५ हजाराचा सॅमसंग कंपनीचा टीव्ही, २० हजाराचे वॉशिंग मशिन, ३५ हजाराचा इन्र्व्हटर व बॅटरी, १० हजाराचा स्टॅबिलायझर, अडीच हजाराचा टेबल फॅन, १ हजाराचा स्टोव्ह, ३ हजाराची सिलेंडर टाकी, असा एकूण १ लाख २० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याबाबतची फिर्याद वसंत आग्रे यांनी ६ नोव्हेंबर रोजी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला.