रत्नागिरी : शहरातील नाचणे पॉवर हाऊस येथे दुचाकीच्या धडकेत रिक्षातील ४ जण जखमी झाल्याची घटना ३० ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली होती. या अपघातात ४ जणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वारावर ६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्यन संतोष नागवेकर (२०, हातीस, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर लतिकेश कमलाकर भोरे (२२), संतोष तुकाराम माचिवले (५१), प्रज्वल संतोष माचिवले (२२), ऐश्वर्या संतोष माचिवले (२०), आर्यन संतोष नागवेकर (२०, सर्व रा. रत्नागिरी) अशी जखमी झालेल्या ४ जणांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लतिकेश भोरे हा आपल्या ताब्यातील (एमएच०८, बीसी ४९४) रिक्षातून संतोष माचिवले, प्रज्वल माचिवले, ऐश्वर्या माचिवले, आर्यन नागवेकर यांना घेऊ न नाचणे सुपलवाडी ते मारुती मंदिर असा जात होता. यावेळी परकार हॉस्पीटलमध्ये जाण्यासाठी त्याने पॉवर हाउस बस स्टॉपजवळ रिक्षा आरोग्य मंदिरच्या दिशेने इंडिकेटर लावून वळवली. याचवेळी पाठीमागून नाचणेहून रत्नागिरीच्या दिशेने सुसाट येणाऱ्या आर्यन नागवेकर याने उजव्या बाजूने रिक्षाला जोरदार धडक दिली. यामध्ये रिक्षा चालक लतिकेश भोरे सह तिघेजण प्रवासी जखमी आले. या चौघांच्या दुखापतीस व स्वतःच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आर्यन नागवेकर याच्यावर गुन्हा दाखाल करण्यात आला.