सांगलीतील 6 जण जखमी,खेडमधील 3 जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
रत्नागिरी:-गणपतीपुळे निवळी मार्गावर गुरुवारी सायंकाळी 3.30 वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ आणि कार यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात 9 जखमी झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. यातील 6 जण सांगली येथील असून 3 खेड येथील आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सविस्तर वृत्त असे की, देवरूख वरून गणपतीपुळेच्या दिशेने कार चालक चालला होता. यावेळी गणपतीपुळेवरून सांगलीच्या दिशेने चाललेल्या स्कॉर्पिओ आणि कार यांच्यात जाकादेवी दरम्यान समोरासमोर धडक झाली. या धडकेत स्कॉर्पिओतील 6 जण जखमी झाले आहे. यामध्ये वृध्द आणि मुलांचा समावेश आहेत.
या अपघातात विमल प्रकाश शिंदे (60, बोरगाव, सांगली), निलेश प्रकाश शिंदे (36, बोरगाव, सांगली), प्रणाली सुशांत शिंदे (21, सांगली), जगन्नाथ दिनकर पाटील (50, खेड), जयश्री जगन्नाथ पाटील (45, खेड), अवनिष जगन्नाथ पाटील (8, खेड), ध्रुवराज निलेश शिंदे (8, बोरगाव, सांगली ), अश्विनी निलेश शिंदे (35, बोरगाव, सांगली), शुभांगी रवींद्र जाधव (40, बहिरेवाडी, कोल्हापूर) अशी 9 जखमीची नावे आहेत. यामधील तिघेजण हे खेड येथील असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. 8 वर्षाची दोन मुले आहेत. अपघाताची अधिक माहिती नोंदवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.