तुषार पाचलकर / राजापूर
राजापूर अखंड वारकरी सांप्रदाय च्या वतीने आज षष्ठी च्या दिवशी पंढरपूर यात्रेचे नियोजन करण्यात आलं आहे यामध्ये आजपासून राजापूर व राजापूर पूर्व भागातून एस.टी. महामंडळाच्या एकूण अठरा बसेस पंढरपूर ला रवाना होणार असून त्यातील आज सकाळी हरळ, परुळे, पाचल, येरडव, करक, पांगरी या गावच्या वारकऱ्यांना घेऊन एकूण सात एसट्या पंढरपूर साठी रवाना झाल्या आहेत.उर्वरित जवळपास सोळाशे पेक्षा जास्त वारकरी हे एकादशी पर्यंत पंढरपूर ला जाणार असून तूळशी विवाहपर्यंत हे सर्व वारकरी आपल्या स्वगावी परतणार असल्याची माहिती राजापूर अखंड वारकरी सांप्रदाय चे सहसचिव रामचंद्र उर्फ पप्पू साळवी यांनी दिली आहे.अखंड वारकरी सांप्रदाय राजापूर तालुक्याच्या वतीने दरवर्षी राजापूर मधून अनेक वारकरी पंढरपूरला श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शनाला जातात यावर्षी मात्र जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये महिलांची संख्या जास्त प्रमाणात दिसून येत असल्याची माहिती अखंड वारकरी चे अध्यक्ष शंकर उर्फ आण्णा पाथरे यांनी दिली.