चिपळूण:-तालुक्यातील चिंचघरीसह वीरबंदर या दोन ठिकाणी गैरकायदा गावठी दारु विक्री करणाऱ्यांवर मंगळवारी चिपळूण तसेच सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अरविंद गोविंद चाळके (44, चिंचघरी), तर विजय महादेव नलावडे (48, वीरबंदर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या बाबतची फिर्याद अशोक विठ्ठल मुंढे, सारिका सुदेश सावंत यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चिंचघरी येथे शेतघराजवळ पेंढयाच्या उडवीच्या आडोशाला अरविंद चाळके हा हातभट्टीची गावठी दारुची विक्री करत होता. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून 1,100 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबरोबरच विजय नलावडे हा वीरबंदर खाडीकिनारी झाडीझुडपाच्या ठिकाणी गैरकायदा हातभट्टीची गावठी दारुची विक्री करत होता. त्याच्याकडून 2 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.