मुंबई:-मुंबईतील बीकेसी येथे महाविकास आघाडीची महाराष्ट्र स्वाभिमान सभा घेण्यात आली. या सभेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या सभेत राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महायुती सरकारवर जबरदस्त प्रहार केला.
तसेच महाविकास आघाडी सरकार आल्यावर शेतकऱ्यांसाठी ‘कृषी समृद्धी योजना’ राबवली जाणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजाराचे प्रोस्हान देण्याचे आश्वासनही शरद पवार यांनी दिले.
लोकसभा निवडणुकीत जनतेने राज्यातील 48 जागांपैकी 31 जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळवून दिला आहे. जनतेने दिलेली ही शक्ती देशाच्या राजकारणात दिसत आहे, त्याबाबत जनतेचे आभार मानत आहे. आता विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. आता हे राज्य कसे चालवायाचे, कोणाच्या हातात द्यायचे याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. गेल्या पाच वर्षात उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ सोडला तर राज्याला मागे नेण्याचे काम झाले आहे. महाराष्ट्राची अशी परिस्थिती कधीही नव्हती, असा हल्लाबोल शरद पवार यांनी महायुती सरकारवर केला.
महाविकास आघाडी सरकार पाडून त्यांनी सरकार स्थापन केले. त्यानंतर राज्याची पिछेहाट झाली. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई, राज्यातील उदोयग बाहेरच्या राज्यात गेले. तरुणांचा रोजगार हिरावला गेला. राज्यात महिला असुरक्षित आहे. शिक्षणाच्या अनेक समस्या आहे. शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार सुरू आहे. प्रत्येक क्षेत्रात राज्याची घसरण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज देशाच्या स्वाभिमानाचे प्रतिक आहे. असे असतानाही भ्रष्टाचारामुळे सिंधुदुर्गात छत्रपतींचा पुतळा कोसळला. राज्यात छत्रपतींचे अनेक पुतळे 100 वर्षांपासून तसेच आहेत. मात्र, सिंधुदुर्गातील पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर कृषी समृद्धी योजना राबवली जाईल. या योजनेत 3 लाखपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल. तसेच नियमित कर्जफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजाराचे प्रोत्साहन देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनाही सण उत्सव साजरे करण्यासाठी त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात येतील. बळीराजाला वाचवण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार आणणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांचे सरकार आणण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार येण्याची गरज आहे. महागाईतून सुटका करणारे, बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करणारे, महिलांना संरक्षण करणारे, मागास, आदिवासी समाजाला सन्मानाने जगता येईल, असे सरकार महाविकास आघाडी सरकार देईल, असे आश्वासनही शरद पवार यांनी दिले.